सोनई : प्रस्तावित राहुरी–श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर रेल्वेमार्गासाठी सुरू करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आणि हरकतींचा गांभीर्याने विचार करून सदर भूसंपादन प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.यावेळी संगमनेरचे आ. अमोल खताळ उपस्थित होते.दि. ६ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन राहुरी–श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर रेल्वेमार्गासंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे राहुरी तालुक्यातील देसवंडी, तमनर आखाडा, कोंढवड, उंबरे, ब्राम्हणी तसेच नेवासा तालुक्यातील वंजारवाडी, बेल्हेकरवाडी, कांगोणी आणि सोनई व शनिशिंगणापूर सारख्या गावांतील मोठ्या प्रमाणावर बागायती जमीन संपादित केली जाणार असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.या सर्व गावांतील बहुतांश जमीन बागायती असून काही गावे मुळा नदीच्या काठावर वसलेली आहेत. येथील जमीन अत्यंत सुपीक व कसदार असल्याने भूसंपादनामुळे अनेक शेतकरी विस्थापित होण्याची भीती आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रस्तावित भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शविला असून त्यांची भूमिका रेल्वेमंत्र्यांसमोर मांडण्यात आली.यावेळी रेल्वे बाधित शेतकरी कृती समिती प्रतिनिधी, राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी. सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करून सर्वमान्य, न्याय्य आणि शेतकरीहिताचा तोडगा काढण्यात यावा, अशी मागणीही यावेळी खा. वाकचौरे व आमदार लंघे यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी भूमिका स्पष्ट केली.केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भावना आणि मांडण्यात आलेल्या मुद्द्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यानंतर देण्यात आली.

COMMENTS