मुंबई: शिर्डी येथील 'सहायक केन्द्रीय गुप्तवार्ता अधिकारी' (आयबी) यांच्या कार्यालय आणि निवासस्थानासाठी मंजूर करण्यात आलेल्या जागेत बदल करण्याचा नि

मुंबई: शिर्डी येथील ‘सहायक केन्द्रीय गुप्तवार्ता अधिकारी’ (आयबी) यांच्या कार्यालय आणि निवासस्थानासाठी मंजूर करण्यात आलेल्या जागेत बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
या निर्णयानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील शेती महामंडळाच्या मालकीच्या गट क्रमांक ७०/१ मधील १२०० चौ.मी. क्षेत्र परत घेऊन, त्याबदल्यात गट क्रमांक ९०/२ मधील समान क्षेत्र (१२०० चौ.मी.) सहायक केंद्रीय गुप्तवार्ता अधिकारी, शिर्डी यांना कार्यालय व शासकीय निवासस्थानासाठी प्रदान करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत या निर्णयाला कार्योत्तर मंजुरी मिळण्याच्या अधीन राहून ही मंजुरी देण्यात आली आहे.
या बदलामुळे संबंधित शासकीय कार्यालयासाठी अधिक योग्य जागा उपलब्ध होणार असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेला अधिक चालना मिळेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

COMMENTS