Homeताज्या बातम्या

प्रा.  देशमुख जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून  सन्मानित

अकोले : क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय आणि समर्पित कार्याबद्दल कोतुळेश्वर विद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. बी. के.  देशमुख यांचा अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रा. देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.प्रा. देशमुख यांनी रयत शिक्षण संस्थेच्या अकोले, संगमनेर आणि कोपरगाव तालुक्यांतील विविध शाळांमध्ये सेवा बजावली. सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देत अनेक उत्कृष्ट खेळाडू घडविले. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासोबतच क्रीडा क्षेत्रासाठी दिलेली त्यांची प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा लक्षात घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी त्यांचा गौरव केला.

अन्यायकारक निलंबने ; शासनाचा निषेधआश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
महादेव कोळी समजातील जाधव भावकीचा आज स्नेह मेळावा
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा; अकोले दिव्यांग क्रांती संघटनेची मागणी

COMMENTS