श्रीगोंदा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथील माऊली संपर्क कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रमुख नागरिकांची नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी उपस्थितांशी सविस्तर संवाद साधत निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक तयारी, गावपातळीवरील विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांचा गटनिहाय आढावा घेतला.यावेळी युवा नेते प्रतापसिंह पाचपुते यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रत्येक गावात पक्षाची संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला. गावागावातील जनभावना जाणून घेत विकासकामांबाबत नागरिकांच्या अपेक्षा, प्रलंबित प्रश्न आणि त्यावरील उपाययोजनांबाबत उपस्थितांनी आपल्या सूचना मांडल्या. आगामी निवडणुकीत प्रभावी नियोजनासाठी बूथनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.बैठकीत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, नवमतदारांची नोंदणी, नावांतील त्रुटी दुरुस्ती तसेच स्थलांतरित मतदारांच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.आमदार विक्रम पाचपुते यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, आगामी निवडणुका लक्षात घेऊन प्रत्येक बूथवर सक्षम संघटन उभे करणे, नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि विकासकामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गावागावातील प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करून जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.बैठकीस आढळगाव परिसरातील विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथप्रमुख आणि प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीला अधिक गती देण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS