Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी : रामदास आठवलेंचा जावईशोध

कराड : बैलगाडी शर्यतीचा विषय कोरोना असल्यामुळे बंदी घालण्यात आल्याचा जावई शोध केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व आरपीआईचे राष्ट्रीय अध्यक्ष (आठवले)

करहर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी; 151 दात्यांनी केले रक्तदान
ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमिवर सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज; जिल्हा रुग्णालयात 100 बेडसह दोन आसीयू राखीव : डॉ. सुभाष चव्हाण
रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

कराड : बैलगाडी शर्यतीचा विषय कोरोना असल्यामुळे बंदी घालण्यात आल्याचा जावई शोध केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व आरपीआईचे राष्ट्रीय अध्यक्ष (आठवले) रामदास आठवले यांनी लावला आहे.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत मे म्हणाले, बैलगाडी शर्यती होत असतात. मात्र, दोन वर्ष कोरोना असल्यामुळे आणि गर्दी होत असल्याने काही ठिकाणी त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ग्रामीण भागात क्रिकेट आहे त्याच्या स्पर्धा होतात. त्याप्रमाणे गावात बैलगाड्याच्या शर्यतीला परवानगी द्यावी. गावात बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यायला काही हरकत नाही. तसेच बंदी असेल तर कोरोना संपल्यानंतर राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली पाहिजे. या कृषिप्रधान देशाच्या केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याने शेतकर्‍यांच्यात व बैलगाडा प्रेमींच्यात नाराजी दिसून येणार आहे.

COMMENTS