Homeताज्या बातम्या

गावठी दारूविक्री करणारा जेरबंद

सोनई  : शिंगणापूर-सोनई मार्गावर अवैध गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर शिंगणापूर पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत १० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन भिमराज पवार (वय ४०, रा. बऱ्हाणपूर शिवार, ता. नेवासा) हा अवैध गावठी दारू घेऊन शिंगणापूर–सोनई मार्गावरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १.०५ वाजता संशयितास ताब्यात घेतले.त्याच्याकडील तपासणीदरम्यान १० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आढळून आली. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरली जात असल्याचा आरोप असलेलीएमएच-१७-डीएफ-१९५८ क्रमांकाची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. दारू व वाहनाची मिळून अंदाजे ५१ हजार रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संजय हिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.  शिंगणापूर परिसरात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेली दारू कुठून आणण्यात आली होती, तिचा पुरवठादार कोण आहे तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शिंगणापूर पोलीस करीत आहेत.

गेवराईत बनावट ‘सिंधी’ गुत्त्यावर छापा; 4.71 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई; 80 गुन्हे दाखल, 1.27 कोटींचा मुद्देमाल जप्त
किनवटमध्ये अवैध धंदे चालवणार्‍यांची गय नाही; नवनियुक्त एसडीपीओ चंद्रशेखर कदम यांचा कडक इशारा
फुलेनगरमधील गावठी दारूची हातभट्टी जप्त Nashik Marathi News | nashik police  gavthi daru seized in Phule Nagar | Latest Nashik News at Lokmat.com

COMMENTS