Homeताज्या बातम्या

बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली दैठण येथील युवकांचा भाजपात प्रवेशराष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे दैठण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी भाजपा नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृ

गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; 17 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील जिल्हा परिषद शाळेचे यशस्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रमात तृतीय क्रमांक
कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यूफरशी धुण्याचे काम सुरू असताना घडली दुर्घटना; परिसरात हळहळ



गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे दैठण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी भाजपा नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. युवानेते रोहित पंडित आणि युवा नेते यशराज पंडित यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
तुमची आमची भाजपा सर्वांची भाजपा म्हणत दैठण येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते माऊली पंडित, बळीराम पंडित, कृष्णा पंडित, सुदर्शन गायकवाड, महेश देशमुख आणि दीपक पंडित यांनी आपल्या सहकार्‍यांसह माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी युवा नेते रोहित पंडित आणि युवा नेते यशराज पंडित यांनी त्यांचे सत्कार करून, भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले. गावाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करणार आहोत. प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते सतत धावून येतात अशा खंबीर नेतृत्वाची सामान्यांना गरज असल्याच्या भावना, भाजपात प्रवेश केलेल्या या तरुणांनी व्यक्त केल्या. कोणतीही अडचण आली तर तिथेच आमच्यापर्यंत पोहोचवा ती सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी रोहित पंडित आणि यशराज पंडित यांनी दिली.  याप्रसंगी शरद पंडित, जगदीश पंडित, विश्वराज पंडित, सुशील जामकर, सचिन पंडित आणि सह ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS