देवळाली प्रवरा : आषाढी वारीचे औचित्य साधत पीएमश्री जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडी आणि रिंगण सोहळ्याने देवळाली प्रवरा भक्तिरसात न्हाऊन निघाले. विठ्ठलनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ज्ञानबा-तुकारामांच्या जयघोषात चिमुकल्या वारकऱ्यांनी सादर केलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. दिंडीत विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, वाचनाचे महत्त्व, संतुलित आहार, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन तसेच मराठी शाळा वाचवा अशा विविध सामाजिक विषयांवरील संदेश फलकांच्या माध्यमातून जनजागृती केली.दिंडीत दीपांश भूमकर व शौर्य मुसमाडे यांनी विठ्ठलाची, तर प्रतीक्षा घुले व सोमेश्वरी नालकर यांनी रुक्मिणीची वेशभूषा साकारली. शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रिंगण सोहळ्यात टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी पारंपरिक पावली खेळ सादर करत वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. या भक्तिमय वातावरणामुळे देवळालीकरांना जणू पंढरपूरची वारीच अनुभवायला मिळाली.दिंडी साई मंदिरात पोहोचल्यानंतर संदीप मुसमाडे यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले. तसेच या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी गोड जेवणाची व्यवस्था शिक्षणप्रेमी पालक आणि शिक्षकांच्या वतीने करण्यात आली. ‘माऊली… माऊली…’च्या जयघोषात दिंडीची सांगता झाली.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुनील लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मुख्याध्यापिका नंदा थोरात तसेच शिक्षिका मनीषा कुंभारकर, प्रतिभा बोबे, अयोध्या कुडके, सुप्रिया आंबेकर, सीमा ढाळे, मनीषा शिंदे, ज्योती म्हस्कुले आणि अर्चना माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
motionR: 0;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 88.87714;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 43;

COMMENTS