Homeताज्या बातम्या

आ. काळेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना दप्तराचे  वाटप

 कोपरगाव : मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस यावर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून  सामाजिक बांधिलकी जपत विविध शैक्षणिक उपक्रमांनी साध्या व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना काळे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना स्कूल बॅगमिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याबरोबरच चांगले संस्कार आणि शिस्त जोपासण्याचे आवाहन केले.याप्रसंगी बोलतांना उपस्थितांनी सांगितले की, आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील गावांमध्ये रस्ते, पूल व इतर विकासकामांमुळे विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ झाला असून ग्रामीण शिक्षणाला चालना मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.यावेळी सडे गावचे सरपंच सतीश बारहाते, ग्रामसेवक चंदकांत जोशी, गणेश बारहाते, संदीप बारहाते, रमेश वाकचोरे, अमोल कोताडे, विजय बारहाते, संतोष बारहाते, अनिल बारहाते, माणिक बारहाते, सुरज बारहाते, वृषाल बारहाते, रुपेश बारहाते, अतुल बारहाते, घनशाम बारहाते, तुकाराम बारहाते, जगनाथ बारहाते, पंडित गुंजाळ, सागर बारहाते व शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते.  

समाधान शिबिरातून महसूलविषयक प्रलंबित प्रश्न मार्गीआ. दाते ; भाळवणीत २६०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध सेवांचा लाभ
१३७ वर्षांचा इतिहास असलेल्या कर्जत उपकारागृहाला अखेर कुलूप !२७ आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी; पोलीस, न्यायालयासमोरील अडचणी वाढतील?
असंघटित कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना : आ. राजळे

COMMENTS