Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘ईडी’ने कन्नड साखर कारखाना केला जप्त

आमदार रोहित पवार यांना धक्का ; बारामती अ‍ॅग्रोने केला होता कारखाना खरेदी

छ.संभाजीनगर ः आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई शुक्रवारी अंमलबजावणी संचालना

 मोकाट कुत्र्यांविरोधात एमआयएमचे मनपा समोर मिठाई वाटत आंदोलन 
समृद्धीवरील अपघातात 12 जणांचा मृत्यू
जी-20 परिषदेच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजी नगर च्या लेणीला भेट

छ.संभाजीनगर ः आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्यामुळे आमदार रोहित पवारांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरु होती. ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली. त्यानंतर आता कन्न सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ईडीने शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या जप्त केलेल्या कारखान्याची किंमत ही 50 कोटी 20 लाख इतकी आहे. या प्रकरणी 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राष्ट्रवादीचे अनेक नेते आरोपी बनवण्यात आले होते. रोहित पवार यांचीसुद्धा जवळपास 3 दिवस चौकशी झाली होती. सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर ईडीकडून कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करताना शिखर बँकेने जी प्रक्रिया राबवली होती ती चुकीची होती असे ईडीने म्हटले होते. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घेत ईडीने प्राथमिक तपासाला सुरुवात केली. तसेच मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी 2019 मध्ये दिलेल्या निकालाचादेखील अभ्यास करण्यात आला. या प्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता ईडीकडून बारमती अ‍ॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती. आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अ‍ॅग्रो कंपनीची मालकी आहे. बारामती अ‍ॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावत चौकशी करण्यात आली होती.

मनी लाँडरिंग प्रकरणी कारवाई – ईडीने शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या कारखान्याची किंमत ही 50 कोटी 20 लाख इतकी आहे. या प्रकरणी 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी ईडीकडून रोहित पवार यांचीसुद्धा जवळपास 3 दिवस चौकशी करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ईडीकडून कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे.

COMMENTS