Homeताज्या बातम्या

नीट परीक्षेतून झालेल्या डॉक्टरांची तपासणी मोहीम सुरू करा तकलादू डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रातून हद्दपार करा – एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे

बीड : नीट परीक्षेतून झालेल्या डॉक्टरांची तपासणी मोहीम सुरू करावी आणि तकलादू डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रातून हद्दपार करावे, अशा मागण्या मुक्त पत्र

आषाढी वारीत ७.४७ लाख वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ उपक्रम यशस्वी
१ ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम; एलपीजी दरांपासून ते आयटीआर अन् रेल्वे तिकिटांपर्यंत तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लायन्स मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना भोजनदान; कोपरगाव शिवसेनेचा सामाजिक उपक्रम

बीड : नीट परीक्षेतून झालेल्या डॉक्टरांची तपासणी मोहीम सुरू करावी आणि तकलादू डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रातून हद्दपार करावे, अशा मागण्या मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (दोन्ही), गृहमंत्री, आरोग्य मंत्री, उच्च शिक्षण मंत्री यांच्यासह अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनातून केल्या आहेत.

गेल्या काही वर्षापासून नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात लागे-बांधे, आर्थिक देवाण-घेवाण आणि भ्रष्टाचार बोकाळल्याचे जग जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासनाने नीट परीक्षेतून झालेल्या तकलादू डॉक्टरांची शोध मोहीम सुरू करावी. कारण अलीकडच्या काळात दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्याशिवाय रोगाचे निदानच केले जात नाहीत. गेल्या काही वर्षांपासून इयत्ता बारावीच्या मेरिट वर एमबीबीएस सह अन्य पेथी मध्ये डॉक्टरकीचे शिक्षण घेण्याकरिता प्रवेश न देता नीट परीक्षेतून सर्व पेथीच्या शिक्षणात गुणांकानुसार प्रवेश दिला जातोय. पूर्वी बारावीनंतर डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेले डॉक्टर आजारी रुग्णाच्या नाडीचे ठोके, जिव्हा, डोळे पाहून आणि स्टेथेस्कोप लावून रूग्णांच्या रोगाचे निदान करायचे. त्यानुसार उपचार करायचे. ते अगदी चपखल असायचे. आज मात्र नीट परीक्षेच्या माध्यमातून डॉक्टर झालेल्या डॉक्टरांना या तिन्ही बाबींशी काही एक देणे घेणे असल्याचे दिसत नाही. रुग्ण दवाखान्यात गेला की, त्याला रक्त, लघवी, इसीजी, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय अशा विविध तपासण्या केल्याशिवाय आजच्या डॉक्टरांना रुग्णांच्या रोगाचे निदान करता येत नाही. म्हणून नीट परीक्षा देऊन डॉक्टर झालेले असे हे तकलादू डॉक्टर चांगले की पूर्वी बारावीनंतर डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन झालेले डॉक्टर चांगले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजचे डॉक्टर्स वेगवेगळ्या तपासण्या केल्याशिवाय रोगाचे निदान करत नाहीत. ही बाब लक्षात घेता आता शासन-प्रशासनाने नीट परीक्षेतून झालेल्या तकलादू डॉक्टरांचीच तपासणी मोहीम सुरू करावी आणि तकलादू डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रातून हद्दपार करावे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चुकीचे उपचार आणि आर्थिक भुर्दंडापासून वाचवावे, असेही निवेदनात नमूद केले आहे.

COMMENTS