Homeताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लायन्स मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना भोजनदान; कोपरगाव शिवसेनेचा सामाजिक उपक्रम

कोपरगाव शहर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर व तालु

कर्जतच्या ३६० अंगणवाड्यांचा कारभार अवघ्या ३ पर्यवेक्षिकांकडे; १२ पैकी ९ पदे रिक्त असल्याने कामाचा प्रचंड ताण
थोरली पंढरी पोखरी येथे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचा जनसागर; टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण
शिक्षण विभागात ’दहशतशाही’चा आरोप; शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार

कोपरगाव शहर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने कोपरगाव येथील लायन्स मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना भोजनदानाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले.

यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेतली असून युवकांच्या आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा दिला आहे. समाजातील वंचित, गरजू आणि दिव्यांग घटकांप्रती संवेदनशीलता जपत त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

विद्यार्थ्यांना गोडधोड भोजन देताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहून या उपक्रमाचे सार्थक झाल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. “साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांसोबत आनंद वाटण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न असून त्यांचे आशीर्वाद लाभावेत, हीच आमची इच्छा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या प्रसंगी तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, शहरप्रमुख गगन हाडा, उपजिल्हाप्रमुख असलम शेख, उपजिल्हाप्रमुख संजय दंडवते, विधानसभा संघटक बाळासाहेब जाधव, विधानसभा समन्वयक मुन्नाभाई मन्सुरी, मनोज कपोते, विवेक कुलकर्णी, भावेश थोरात, बाळासाहेब मापारी, विठ्ठल निकम, नंदू निकम, संजय गुंजाळ, करणा जावळे, युवासेना तालुकाप्रमुख विजय गोरडे, रवी देवकर, काना हाडा, वैभव शेलार, पियुष सैंदाणे, समीर पटवेकर, निखिल कंकाळे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS