Homeताज्या बातम्या

नेकनूरच्या शासकीय अध्यापक विद्यालयातील उर्दू माध्यमासाठी शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर

बीड : नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालय (डी.एड. महाविद्यालय) येथे उर्दू माध्यमासाठी शिक्षकांची पाच पदे मंजूर असतानाही एकही शिक्षक कार्यरत नसल्

मुक्त पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा
राम मंदिरातील देणगी चोरीची SIT कडून चौकशी करा; काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांची मागणी
समाजसेवेचा अखंड वसा जपणारी शिवनेरी पतसंस्था; वारकरी सेवेसाठी रेनकोट वाटप व विविध उपक्रमांमुळे कौतुक

बीड : नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालय (डी.एड. महाविद्यालय) येथे उर्दू माध्यमासाठी शिक्षकांची पाच पदे मंजूर असतानाही एकही शिक्षक कार्यरत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त पदे तात्काळ भरावीत, या मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनचे राज्य प्रवक्ता मा. मुशीरभाई ईनामदार, जमीयतुल उलेमा-ए-हिंदचे मराठवाडा उपाध्यक्ष मुज्तबा अहमद खान साहेब, जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला साहेब तसेच जिल्हासचिव साबेर मौलाना साहेब उपस्थित होते. शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा करून उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अभावामुळे भेडसावणार्‍या गंभीर शैक्षणिक अडचणी निदर्शनास आणून दिल्या. यावर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची हमीही दिली. उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मंजूर असलेली सर्व रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, हीच संबंधितांची प्रमुख मागणी आहे.

COMMENTS