Homeताज्या बातम्या

महिला उद्योजकांना मिळणार हक्काचे व्यासपीठ; ‘तेजस्विनी’तर्फे बीडमध्ये दोन दिवसीय भव्य प्रदर्शन

बीड : आगामी नागपंचमी आणि रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महिला उद्योजकांच्या हाताला काम आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठ

’शहराचा तिसरा डोळा’ मिटला; बंद सीसीटीव्हींमुळे सुरक्षेची हमीच संशयाच्या भोवर्‍यात
आषाढी एकादशीनिमित्त भगवानगडावर पाच लाख भाविकांची उपस्थिती; विजयी पांडुरंगाचे व भगवानबाबांचे घेतले दर्शन
माहिती अधिकारचे सात अर्ज फेटाळले; वरूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर आरोप, चौकशीची मागणी

बीड : आगामी नागपंचमी आणि रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महिला उद्योजकांच्या हाताला काम आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘तेजस्विनी ग्रुप’च्या वतीने दोन दिवसीय भव्य वस्तू प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी (दि. 8 व 9 ऑगस्ट 2026) कॅनॉल रोडवरील रामकृष्ण लॉन्स येथे भरवले जाणार आहे.

तेजस्विनी ग्रुपच्या संस्थापिका सोनल अरविंदसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रदर्शनात बीड जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील अनेक महिला उद्योजक सहभागी होणार आहेत. यामध्ये सण-उत्सवाच्या खरेदीसाठी लागणार्‍या विविध वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध असतील. प्रदर्शनात महिलांसाठी खास मनमोहक पैठणी, ब्रँडेड साड्या, डिझायनर कुर्तीज, लेडीज वेअर्स, फ्रॉक्स, स्टोल, ओढणी यासह मोत्यांचे दागिने, फॅन्सी बांगड्या आणि सौंदर्य प्रसाधने उपलब्ध असणार आहेत. याशिवाय घरगुती बनावटीचे साबण, हेअर ऑईल, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स, शुद्ध तूप, पंचगव्य नैसर्गिक उत्पादने, अगरबत्ती, तसेच घरगुती मसाले, लोणचे, विविध चटण्या आणि खमंग खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे. देवांसाठी लागणारी वस्त्रे आणि चॉकलेट्सचे विशेष स्टॉल्स देखील आकर्षण ठरणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी 10:00 वाजेपासून नागरिकांसाठी खुले राहील. स्थानिक आणि ग्रामीण भागातील महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच सणाची खरेदी एकाच छताखाली करण्यासाठी बीड शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी सहकुटुंब या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजिका सोनल अरविंदसिंह पाटील यांनी केले आहे.

COMMENTS