बीड : बीड शहरातील स्वराज्य नगर येथील ज्ञानेश्वरी चे गाढे अभ्यासक श्री.ह.भ.प. माधव महाराज डाके यांच्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चातुर्मास उत्सव

बीड : बीड शहरातील स्वराज्य नगर येथील ज्ञानेश्वरी चे गाढे अभ्यासक श्री.ह.भ.प. माधव महाराज डाके यांच्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चातुर्मास उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात व आनंदात सुरू झालेला आहे. या चातुर्मास उत्सवात प्रत्येक सोमवारी रात्री 8.00 ते 9.00 या वेळेत बीड जिल्ह्यातील नामवंत,प्रज्ञावंत ज्ञानेश्वरी अभ्यासक व कीर्तनकार महाराजांच्या रसाळ व प्रासादिक प्रवचन सेवा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यावर्षीच्या चातुर्मास उत्सवातील प्रतिसोमवार प्रवचन सेवेच्या सत्रातील तिसरे पुष्प दिनांक 10 ऑगस्ट 2026 सोमवार रोजी ज्येष्ठ कीर्तनकार व गायत्री परिवाराचे बीड जिल्हा समन्वयक मोहन महाराज खरमाटे हे आपल्या रसाळ वाणीतून गुंफणार असून सदरील प्रवचन सेवेचे थेट प्रक्षेपण माधव महाराज डाके या फेसबुक चॅनल वरती केले जाणार आहे. याची भाविकांनी नोंद घ्यावी. या प्रवचन सेवेचा लाभ बीड शहर व परिसरातील परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संयोजक श्री.ह.भ.प. माधव महाराज डाके काठवडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

COMMENTS