Homeताज्या बातम्या

‘एसआयआर’चे काम पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा देवळालीत सत्कार

देवळाली प्रवरा: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रासह ३२ गावांतील विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमे

तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी! उष्माघातग्रस्त कुटुंबांनाही मदत; कृषीमंत्र्यांची विधिमंडळात मोठी घोषणा
मातोश्री शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृह प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत; बीडमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
एकत्र विमान प्रवासावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या; “मला पंखच नाहीत, मग छाटणार कोण?” मुख्यमंत्री फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

देवळाली प्रवरा: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रासह ३२ गावांतील विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेचे कामकाज यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचा सत्कार करण्यात आला.

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील यांच्या हस्ते भाग क्रमांक २१९ व २२० चे बीएलओ उबाळे व रणसिंग यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या दोन्ही अधिकाऱ्यांनी विशेष पुनरिक्षण मोहिमेचे कामकाज १०० टक्के पूर्ण केले आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील ३२ गावे आणि एकूण ७७ बीएलओ यांच्या माध्यमातून मतदार यादी पुनरिक्षणाचे काम प्रभावीपणे राबविण्यात आले. त्यामध्ये भाग क्रमांक २१९ अंतर्गत चांदेगाव येथे ९८.१६ टक्के प्रगती नोंदविण्यात आली असून, एकूण मोहिमेचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील यांनी मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक ठेवण्यासाठी बीएलओंनी केलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीची अचूकता अत्यंत महत्त्वाची असून, सर्व बीएलओंनी जबाबदारीने काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

COMMENTS