बीड : श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने आयोजित करण्यात आलेले वारकरी आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. स

बीड : श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने आयोजित करण्यात आलेले वारकरी आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. समाजसेवेच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात २२६ वारकर्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला व आरोग्यविषयक मार्गदर्शनही देण्यात आले. पालखी मार्गावरील पायी प्रवासात वारकर्यांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, या हेतूने आयोजित शिबिराला वारकरी, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरासाठी निमा संघटना बीडचे अध्यक्ष डॉ. अशोक सानप, सचिव डॉ. गनंजय देशपांडे यांच्यासह डॉक्टरांच्या पथकाने दिवसभर वैद्यकीय सेवा दिली. वारकर्यांची रक्तदाब, रक्तातील साखर, ताप, अशक्तपणा, अंगदुखी, पायांच्या तक्रारी तसेच इतर किरकोळ आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक औषधे मोफत देण्यात आली. पायी वारी करणार्या भाविकांना पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमात वैद्यकीय प्रतिनिधी संघटना बीडचे अध्यक्ष जगन्नाथ निकम, प्रशांत घोगरे आणि संघटनेच्या सदस्यांनी औषधांची उपलब्धता, व्यवस्थापन आणि समन्वयाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली. त्यामुळे शिबिर सुरळीत पार पडले. उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख प्रमोद निनाळ आणि अक्षय शेटे यांनी संपूर्ण शिबिराचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. वारकर्यांना कोणताही विलंब न होता आरोग्य सेवा मिळावी, यासाठी स्वयंसेवकांनी दिवसभर कार्य केले. त्यांच्या नियोजनामुळे शिबिर शिस्तबद्ध आणि परिणामकारक ठरले. या शिबिरात गोपाल लड्डा, सुहास बेदरे, प्रमोद करमाळकर, संदीप खोड, सुमित जयस्वाल, विकास उमापूरकर, राम मोटवानी, विवेक बडगे, ओमप्रकाश लोहिया, जीवन डोळस, संदेश लोळगे, कमलेश मुंदडा, गणेश मुळे, डॉ. रमेश घोडके, डॉ. मनोज पोहनेरकर, अमर डागा, संतोष पवार, सुहास धाट, परमेश्वर जाधव, सुरज लाहोटी, रत्नाकर क्षीरसागर आणि कुमार देशमुख यांच्यासह अनेक रोटेरिअन्सनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी ठरला. रोटरी क्लब ऑफ बीडने समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा कायम राखत वारकर्यांच्या सेवेला प्राधान्य दिले. निमा संघटना, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, डॉक्टर, वैद्यकीय प्रतिनिधी आणि सर्व स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सेवाभावी संस्थांची एकत्रित ताकद रोटरी क्लब ऑफ बीड, निमा संघटना आणि वैद्यकीय प्रतिनिधी संघटना यांच्या संयुक्त सहकार्यामुळे आरोग्य तपासणी शिबिर प्रभावीपणे पार पडले. डॉक्टर, वैद्यकीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवकांनी समन्वयातून वारकर्यांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. समाजहितासाठी विविध संस्थांनी एकत्र येत केलेले हे कार्य सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरले.
प्रकल्प प्रमुखांचे नियोजन ठरले यशाचे सूत्र प्रकल्प प्रमुख प्रमोद निनाळ आणि अक्षय शेटे यांनी शिबिराचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. वारकर्यांना कोणताही अडथळा न येता आरोग्य सेवा मिळावी यासाठी स्वयंसेवकांचे नियोजन, डॉक्टरांशी समन्वय आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

COMMENTS