Homeताज्या बातम्या

यशवंत माध्यमिक विद्यालय कुर्ला येथे ’पोक्सो कायदा व बालहक्क’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

बीड : आज सकाळी 05/08/2026 रोजी यशवंत माध्यमिक विद्यालय कुर्ला (ता. जि. बीड) येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे पोक्सो कायद्याविषयी जाणूया, बा

लोकमंथनच्या वृत्ताचा प्रशासनाला धक्का; सेतू केंद्र चालकांना तहसीलदारांचा कडक इशारा
पिकविमा व सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चाचा संघर्ष सुरूच राहणार; म्हासापूर येथे शासन निर्णयाची होळी
कुंडलवाडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

बीड : आज सकाळी 05/08/2026 रोजी यशवंत माध्यमिक विद्यालय कुर्ला (ता. जि. बीड) येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे पोक्सो कायद्याविषयी जाणूया, बालहक्कांचे रक्षण करूया या विशेष उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आज सकाळी करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अधिकार मित्र मिथुन जोगदंड यांनी उपस्थितांना बालकांचे मूलभूत हक्क आणि त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली. विशेषतः पोक्सो कायद्यातील विविध तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगत, मुलांनी आपल्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचा टोल फ्री क्रमांक 15100 याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्याचा कसा वापर करावा, हे स्पष्ट केले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालहक्क व सुरक्षेबाबत मार्गदर्शन मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले.

COMMENTS