Homeताज्या बातम्या

स्मशानभूमी भ्रष्टाचारमुक्त करून मृत्यूनंतरची तरी अवहेलना थांबवा : किरण वाघमारे

oplus_131072 बीड : बीड तालुक्यातील मौजे कुमशी येथील दलित वस्तीतील स्मशानभूमी विकासकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्य

धर्मेंद्र प्रधानांची भूमिका संवेदनशील; शेतकरी कर्जमुक्तीचा शब्दही सरकारने पाळला: खा. अशोकराव चव्हाण
श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राजमाता जिजाऊ पतसंस्थेकडून सत्कार
धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 500 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप पुण्यात शानूर भाई शेख यांच्या पुढाकारातून शिक्षणाला प्रोत्साहन; मान्यवरांची उपस्थिती
oplus_131072

बीड : बीड तालुक्यातील मौजे कुमशी येथील दलित वस्तीतील स्मशानभूमी विकासकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले. स्मशानभूमी विकासासाठी मंजूर झालेल्या निधीची निःपक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी व पदाधिकार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये दलित वस्तीतील स्मशानभूमीच्या विकासासाठी १ लाख ८१ हजार ८२८ खर्च झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता स्मशानभूमीत कोणतेही विकासकाम झाल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याशिवाय स्मशानभूमीच्या जागेवर सरपंचांच्या निकटवर्तीय नातेवाईकांनी अतिक्रमण करून कपाशीची लागवड केल्याचा गंभीर आरोपही आंदोलकांनी केला. शासकीय नोंदीनुसार स्मशानभूमीसाठी तब्बल १६ गुंठे जागा उपलब्ध असताना अंतिम संस्कारासाठी पुरेशी जागा नसल्याची वस्तुस्थिती असल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी किरण वाघमारे म्हणाले, माणसाच्या मृत्यूनंतरही त्याच्या सन्मानाची जपणूक होणे आवश्यक आहे. मात्र कुमशी येथील स्मशानभूमीची झालेली दुरवस्था आणि विकास निधीतील कथित गैरव्यवहार ही अत्यंत गंभीर बाब आहे. स्मशानभूमी भ्रष्टाचारमुक्त करून मृत्यूनंतरची तरी अवहेलना थांबवावी. आंदोलकांनी स्मशानभूमीवरील अतिक्रमण तात्काळ हटवून संपूर्ण जागेला संरक्षक कंपाऊंड वॉल उभारण्यात यावा, अंतर्गत रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वृक्षारोपण व अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून आधुनिक आणि सुसज्ज स्मशानभूमी विकसित करण्यात यावी, अशीही मागणी केली.

या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करून निधी अपहार, खोटे अहवाल आणि विकासकामातील अनियमिततेस जबाबदार असलेल्या अधिकारी व पदाधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे.

COMMENTS