Homeताज्या बातम्या

पुणे विषारी दारूने हादरले; १५ जणांचा बळी, मुख्य संशयितांसह आतापर्यंत ९ जणांना अटक अवैध हातभट्टी व्यवसायाविरोधात कठोर कारवाईचे आदेश

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कथित विषारी मद्यप्राशनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १५ वर पोहोचल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे व

विवाहितेचा 8 व्या मजल्यावरून पडून मृत्यू
बळी विषारी दारूचे की व्यवस्थेचे?
विषारी दारूमुळे मृतांची संख्या २२ वर; गावरान दारूमध्ये ‘मिथेनॉल’ मिसळल्याने अनेकांचा मृत्यू
Pune News: Pimpri-Chinchwad Shock, 7 Dead in a Single Day at Phugewadi;  Police Probe Underway

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कथित विषारी मद्यप्राशनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १५ वर पोहोचल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ या भागांमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अवैध हातभट्टी व्यवसायाचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. अनेक नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाले असून या प्रकरणाची व्यापक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रासायनिक द्रव्य मिसळलेल्या हातभट्टीच्या मद्याचे सेवन केल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून वैद्यकीय पथके परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

अटक करण्यात आलेल्या ९ आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून आणखी काही संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागालाही तपासात सहभागी करण्यात आले असून विविध भागांत छापेमारी मोहीम सुरू आहे. तपास यंत्रणा विषारी मद्याची निर्मिती कुठे झाली, त्यासाठी कोणती रसायने वापरण्यात आली आणि त्याचे वितरण कोणत्या मार्गाने झाले याचा शोध घेत आहेत. शहरातील अनेक संशयित ठिकाणांवर धाडी टाकून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. या व्यवसायामागे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता तपासली जात आहे.

दापोडी आणि फुगेवाडी परिसरात एका दिवसात अनेक मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. याशिवाय हडपसर आणि काळेपडळ भागातूनही मृत्यूंच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत उपचार सुरू असलेल्या काही नागरिकांचाही मृत्यू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. रुग्णालयांमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी होत असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परिसरात अवैध हातभट्टीचे मद्य खुलेआम विकले जात असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत होत्या. मात्र त्यावर प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वेळेत कठोर पावले उचलली असती तर अनेकांचे प्राण वाचले असते, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. राजकीय स्तरावरही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी केली असून अवैध मद्यनिर्मिती व विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

दोषींवर कठोर कारवाई व्हावी : मुख्यमंत्री फडणवीस या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. दोषींना कोणतीही सवलत मिळू नये, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास करावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. मृत्यूमागील नेमके कारण शोधून काढण्यासाठी आणि संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी दोन्ही शहरांच्या पोलीस यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

COMMENTS