Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करवसुलीत नवी मुंबई महापालिकेचा नवा उच्चांक; अभय योजनेद्वारे 876 कोटींची ऐतिहासिक वसुली

मुंबई : आर्थिक शिस्त, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नियोजनबद्ध मोहिमा यांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात मालमत्ता

ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : घोगरे 
बारामतीत उमेदवार देण्याचा काँगे्रसचा निर्धार; सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार निश्‍चिती अंतिम टप्प्यात : हर्षवर्धन सपकाळ
गोदावरी संवर्धनासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय;नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन; कोपरगावात २० कोटींच्या कामांना गती

मुंबई : आर्थिक शिस्त, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नियोजनबद्ध मोहिमा यांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीत उल्लेखनीय कामगिरी करत नवा विक्रम नोंदवला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 876 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून, ही रक्कम महापालिकेच्या स्थापनेनंतर एका वर्षात झालेली सर्वाधिक कर वसुली ठरली आहे.
महानगरपालिकेच्या महसुली व्यवस्थापनाला नवे बळ मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबई महानगर प्रदेशातील इतर महापालिकांच्या तुलनेतही नवी मुंबई महापालिका करवसुलीत आघाडीवर राहिली आहे. प्रशासनाच्या मते, ही यशस्वी कामगिरी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, करप्रणाली अधिक सुसूत्र आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. कर वसुली प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. नागरिकांना घरबसल्या कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रतिसादात लक्षणीय वाढ झाली. एकूण वसुलीपैकी सुमारे साठ टक्के रक्कम ही डिजिटल पद्धतीने जमा झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याशिवाय नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी संदेश सेवा, दूरध्वनी, तसेच प्रत्यक्ष भेटींचा वापर करण्यात आला. कर भरण्याबाबतची जागरूकता वाढवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात आल्या. सुट्ट्यांच्या दिवशीही कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने करदात्यांना अधिक सोयीस्कर सेवा मिळाली. थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी 10 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत अभय योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्तांवरील थकबाकी एकरकमी भरल्यास विलंब शुल्कात पन्नास टक्क्यांची सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत अनेक मालमत्ताधारकांनी थकबाकी भरली. परिणामी, महसूल वाढीस लक्षणीय चालना मिळाली आणि एकूण करवसुलीत मोठी भर पडली.

COMMENTS