Homeताज्या बातम्या

मृदा, जल आणि वृक्ष संवर्धन केले तरच भविष्य उज्ज्वल – जलनायक मयंक गांधीसरस्वती नदी पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ; हजारोंच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न

दिंद्रुड येथे सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रारंभ झाला असून जलसंधारणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ग

मिलिंद सरपते यांना राष्ट्रीय राज्यस्तरीय नावलौकिक पद्मपाणी पुरस्कार जाहीर
न्यायालयाच्या ’स्टे’ आदेशानंतरही बांधकाम सुरू असल्याचा आरोप; सिरसाळातील जमीन वादाला नवे वळणमहसूल नोंदीतील कथित फेरफार, जमीन ताबा व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी घटनेनंतर महामार्गालगत विहिरींचा  प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ! आतातरी प्राधिकरण आणि प्रशासनाला जाग येणार का?केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे



दिंद्रुड येथे सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रारंभ झाला असून जलसंधारणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ग्लोबल विकास ट्रस्ट आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्‍या या उपक्रमांतर्गत सरस्वती नदीच्या सुमारे पाच किलोमीटर पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार असून 35 रिचार्ज शाफ्ट उभारले जाणार आहेत. या कामामुळे भूजल पुनर्भरणास चालना मिळून परिसरातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी जलनायक मयंक गांधी, टाटा ट्रस्टचे रवींद्रजीत सिंह, राकेश सिंह, आनंद बारिया, रिमी ओबेरॉय, देवदत्त सिंह आणि देव रंजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरिक संवाद मेळाव्यात हजारो ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना जलनायक मयंक गांधी यांनी जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. पाणी उपलब्ध झाले तर शेतीसह ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळते. त्यामुळे जलसंधारणासोबतच पाण्याचा नियोजनबद्ध वापर करणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले. शेतकर्‍यांनी फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन पद्धती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनक्षमता व उत्पन्न वाढवावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच गुरु पौर्णिमेनिमित्त 23 ते 29 जुलै 2026 या कालावधीत राबविण्यात येणार्‍या 25 लाख वृक्ष लागवड व संवर्धन महाअभियानाची माहिती देत पर्यावरण संतुलनासाठी जलसंधारण आणि वृक्षसंवर्धन हे एकमेकांना पूरक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी लोकसहभागातून जमा केलेली लोकवर्गणी मयंक गांधी यांच्याकडे सुपूर्द केली. शेतकरी, महिला, युवक, ग्रामस्थ तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाटा ट्रस्टचे सहकार्य कायम राहील
यावेळी बोलताना टाटा ट्रस्टचे रवींद्रजीत सिंह म्हणाले, गावांचा एकोपा आणि ग्लोबल विकास ट्रस्टचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. ही चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि देशाच्या विकासासाठी अशा उपक्रमांना बळ मिळावे यासाठी टाटा ट्रस्ट नेहमीच सहकार्य करेल. दुष्काळाकडून समृद्धीकडे सुरू झालेला हा प्रवास कौतुकास्पद असून ग्लोबल विकास ट्रस्टच्या कार्याचा विस्तार देशभर व्हावा, अशी आमची इच्छा आहे.
’या उपक्रमाने केवळ पाणीच नव्हे, मनेही जोडली’
दिंद्रुड येथील शेतकरी पांडुरंग वाकसे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ग्लोबल विकास ट्रस्टच्या मार्गदर्शनामुळे आम्ही फळबाग लागवडीतून एकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहोत. आमच्या गावात कायम पाण्याची टंचाई होती. आता सरस्वती नदीचे पुनरुज्जीवन होत असल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी आशा आहे. शाश्वत पाण्यासाठी गावातील सर्व समाजघटक एकत्र आले असून या उपक्रमाने केवळ पाणीच नव्हे, तर मनेही जोडली आहेत.

COMMENTS