https://www.youtube.com/watch?v=Nng9F0Zi6Hs ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोगातून जुना असलेला शुद्ध पाण्याचा आरो प्लांट स्थलांतरित करून ग्र
ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोगातून जुना असलेला शुद्ध पाण्याचा आरो प्लांट स्थलांतरित करून ग्रामपंचायत जवळ असलेल्या मोकळ्या जागेत माजी सरपंच भानुदास नाना गलधर व भीमराव शिंदे यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले ,
बालमटाकळीचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर राम बामदळे यांनी म्हटले की , या आरो प्लांटच्या माध्यमातून ग्रामस्थांना व व्यवसायिकांना एक रुपया मध्ये एक लिटर तर पाच रुपयांमध्ये दहा लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हा उद्देश असून व्यवसायिकांनी व ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यांनी केले आहे .
यावेळी ग्रामसेवक सुनील काळे , तंटामुक्ती अध्यक्ष कासमभाई शेख , चंद्रकांत पाटील गरड , अशोक खिळे , देविदास पाटील नवले , विक्रम बारवकर , महेश घरगणे , श्याम राजपुरे , मगबुलभाई शेख , अशोक बामदळे , सदाभाऊ निंबाळकर आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते .

COMMENTS