Homeताज्या बातम्या

परळीतील ’त्या’ मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून मित्रांनीच केला खूनस्थानिक गुन्हे शाखे कडून 48 तासांत आरोपी जेरबंद

बीड : परळी वैद्यनाथ येथील लेंडेवाडी शिवारात रेल्वे रुळावर सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी)अवघ्या 48

खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्‍यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी
आनंदगाव बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: माजलगाव न्यायालयाकडून आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
समाजसेवेचा गौरव; गौतम कांबळे पद्मपाणि पुरस्काराने सन्मानित


बीड : परळी वैद्यनाथ येथील लेंडेवाडी शिवारात रेल्वे रुळावर सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी)अवघ्या 48 तासांत यश आले आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटणारी ही घटना प्रत्यक्षात पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेला निर्घृण खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मयताच्या दोन मित्रांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
अफजलखान उर्फ तोहीद कैरातीखान पठाण (वय 36 वर्षे, रा. सरदारनगर, परळी वै.) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर ऋषीकेश परमेश्वर फड (वय 27 वर्षे, रा. सोमेश्वर नगर, परळी) आणि गौरव दिपक व्यास (वय 26 वर्षे, रा. स्नेहनगर, परळी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी मित्रांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मयत अफजलखान हा 31 मे रोजी त्याच्या मित्रांसोबत बाहेरगावी गेला होता, मात्र तो दोन दिवस घरी परतला नाही. त्यानंतर 1 जून रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळून आला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा बारकाईने तपास सुरू केला. तपास सुरू असतानाच गुन्हे शाखेला गुप्त बातमीदार आणि मयताच्या नातेवाईकांकडून काही संशयास्पद माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही(सीसीटीव्ही) फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण (तांत्रिक विश्लेषण) याद्वारे तपासाची चक्रे वेगवान केली. 3 जून रोजी हे दोन्ही आरोपी परळीत आल्याची गोपनीय माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पैशांच्या देणे-घेण्याच्या वादातून आम्हीच अफजलखान याचा दगडाने मारून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर फेकून दिला, अशी कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी परळी ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत. सदरची धडक कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि सुशांत सुतळे, पोलीस अंमलदार आनंद मस्के, रामचंद्र केकान, सचिन सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे आणि नितीन वडमारे यांच्या पथकाने केली आहे.

COMMENTS