Homeताज्या बातम्या

शिवणी भिल्ल वस्तीवर आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादशेकडो लाभार्थ्यांची नोंदणी; आरोग्य संरक्षणाचा लाभ आता थेट लाभार्थ्यांपर्यंत

बीड : केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बीड तालुक्यातील शिवणी येथील

एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ; प्रशासन जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र सज्जछत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादशिबिरे संपली तरी नागरिकांना सेवांचा लाभ कायम मिळणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
स्वानंद सार्वजनिक वाचनालयात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त उत्स्फूर्त भाषण स्पर्धा व व्याख्यान कार्यक्रम संपन्न
बालसंगोपन योजनेचे अनुदान रखडल्याने ‘लाडके भाचे’ आर्थिक संकटातदीड ते दोन वर्षांपासून लाभार्थी प्रतीक्षेत; शिक्षण, पोषण आणि दैनंदिन गरजांवर परिणाम


बीड : केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बीड तालुक्यातील शिवणी येथील भिल्ल वस्तीवर विशेष आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आरोग्य मित्र प्रवीण जोगदंड यांच्या पुढाकारातून तसेच आरोग्य मित्र वैभव भोले यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. शिबिरादरम्यान नागरिकांना योजनेअंतर्गत मिळणार्‍या मोफत आरोग्यसेवा, शासकीय व मान्यताप्राप्त रुग्णालयांतील उपचार सुविधा तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी उपलब्ध असलेल्या लाभांची सविस्तर माहिती देण्यात आली. लाखो रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळवून देणारी ही योजना गरजू कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजनाचे स्वागत केले. भिल्ल वस्तीपर्यंत प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करणे आणि तात्काळ कार्ड उपलब्ध करून देण्याच्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी प्रवीण जोगदंड व वैभव भोले यांचे विशेष कौतुक केले. प्रत्येक पात्र नागरिकाकडे आयुष्मान भारत कार्ड असणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी तातडीने आपले कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन प्रवीण जोगदंड व वैभव भोले यांनी केले.

COMMENTS