Homeताज्या बातम्या

अ.ब.क.ड. उपवर्गीकरण झालंच पाहिजे; न्यायासाठी बीडमध्ये मातंग समाजाचा विराट एल्गार – विनोद हातागळेलाभवंचित घटकांच्या हक्कांसाठी 16 जून रोजी ऐतिहासिक मातंग क्रांती मोर्चा; समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

बीड : अनुसूचित जातीतील लाभवंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अ.ब.क.ड. आरक्षण उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी

बीडच्या राजकारणात ‘रणसंग्राम’; पंडित-क्षीरसागर आमनेसामने, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले
स्वानंद सार्वजनिक वाचनालयात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त उत्स्फूर्त भाषण स्पर्धा व व्याख्यान कार्यक्रम संपन्न
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट-बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी निधीची मागणी-बीड शहर, ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही निवेदन सादर


बीड : अनुसूचित जातीतील लाभवंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अ.ब.क.ड. आरक्षण उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी 16 जून रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या मातंग क्रांती मोर्चाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मातंग समाजाचे युवा नेतृत्व विनोद दादा हातागळे यांनी केले आहे.
विनोद दादा हातागळे म्हणाले की, संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकारानुसार अनुसूचित जातीतील प्रत्येक घटकाला विकासाच्या संधी समान प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. मात्र अनेक दशकांपासून मातंग समाजातील मोठा वर्ग शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अपेक्षित प्रतिनिधित्व व लाभांपासून वंचित राहिला आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आणि समाजाच्या हक्कांसाठी हा विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, अनुसूचित जातीतील अ.ब.क.ड. आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. यामुळे आरक्षणाचा लाभ खर्‍या अर्थाने लाभवंचित घटकांपर्यंत पोहोचेल आणि सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक बळकट होईल. याचबरोबर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना, स्वतंत्र वसतिगृहे, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, आर्थिक विकासासाठी विशेष निधी आणि समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्याही मोर्चाद्वारे मांडण्यात येणार आहेत. हा मोर्चा कोणत्याही व्यक्ती, संघटना किंवा पक्षाचा नसून समाजाच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठीचा संघर्ष आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी प्रत्येक समाजबांधवाने या लढ्यात सहभागी होणे आवश्यक आहे, असेही हातागळे यांनी नमूद केले. 16 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स (स्टेडियम) ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड या मार्गावर निघणार्‍या मातंग क्रांती मोर्चात युवक, महिला, विद्यार्थी, कर्मचारी, कामगार आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजाची एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS