Homeताज्या बातम्या

मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्णदिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्दसलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा ; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात

बीड : राज्य भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या निधनानंतर बीड येथे झालेला शोकसभेत पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशम

गुलाब देत पोलीस म्हणाले, जीव तुमचा आहे अन् नियमही तुमच्यासाठीचबीड पोलीसांनी फुलातून फुलवला वाहतुक शिस्तीचा संदेश
जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षेखा.बजरंग सोनवणेंनी बीडचा आवाज दिल्लीत घुमवला
बीड बायपासवर शेतकर्‍यांचा भव्य रास्ता रोकोसर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटर वाढविण्याची मागणी


बीड : राज्य भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या निधनानंतर बीड येथे झालेला शोकसभेत पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी दिनी ना. पंकजाताईंनी गोपीनाथ गडावरून हा शब्द पूर्ण करत दिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपुर्द केला. दिवंगत एजाज देशमुख यांच्या मुलाच्या हाती धनादेश देत बेटा,  आम्मी का ध्यान रखना  असा सल्ला देत ना. पंकजाताईंनी देशमुख कुटुंबियाप्रती असलेला स्नेह दाखवून दिला. देशमुख कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी भाजपचे प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर यांनी पाठपुरावा करत गोपीनाथराव मुंडे साहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत मिळवून दिली.
परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर बुधवार दि.3 जून 2026 रोजी दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्याच्या पशू संवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदतीचा धनादेश सुपुर्द केला. दिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या पत्नीच्या नावे असलेला धनादेश त्यांच्या मुलाच्या हाती देत पंकजाताईंनी कुटुंब प्रमुखाप्रमाणे देशमुख कुटुंबीयांची ख्याली खुशाली विचारत आईची काळजी घे असा मायेचा सल्ला हाजी एजाज देशमुख यांच्या मुलाला दिला. हाजी एजाज देशमुख हे मुंडे साहेबांचे अत्यंत लाडके कार्यकर्ते होते. अल्पसंख्यांक आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी अविस्मरणीय योगदान दिलेले आहे याची जाणीव ठेवत पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही मदत देशमुख कुटुंबीयांना दिली. बीड येथे भाजप प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर यांच्या पुढाकारातून झालेल्या शोकसभेत पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांना  5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. ताईंनी दिलेला शब्द आज गोपीनाथ गडावरून मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी दिनी पूर्ण केला. यावेळी भाजप नेत्या डॉ. प्रितमताई मुंडे, आ. नमिताताई मुंदडा वयांच्यासह भाजपचे प्रदेश महामंत्री सलीम जहाँगीर,इर्शाद देशमुख, जिल्हाध्यक्ष इर्शादभाई शेख, शेख फारुक,  नूरलाला खान,जिया शेख,अमेर काज़ी,आमू सय्यद आदींची उपस्थिती होती.

COMMENTS