Homeताज्या बातम्या

येमेनजवळ भारतीय जहाजावर भीषण हल्ला; १३ भारतीयांसह सर्व १४ खलाशी सुरक्षित

येमेन: येमेनजवळ एका भारतीय जहाजावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर हे जहाज उलटले असून ते समुद्रात बुडाले. दिलासादायक बाब म्हणजे, जहाजावरील १३ भारत

१ ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम; एलपीजी दरांपासून ते आयटीआर अन् रेल्वे तिकिटांपर्यंत तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा होणार निर्णय! सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात; पुढील सुनावणी ४ ऑगस्टला
अखेर प्रलंबित विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा; आ. भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश
Indian cargo vessel sinks after attack in Yemeni waters; all 14 crew  rescued | India News - The Times of India

येमेन: येमेनजवळ एका भारतीय जहाजावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर हे जहाज उलटले असून ते समुद्रात बुडाले. दिलासादायक बाब म्हणजे, जहाजावरील १३ भारतीयांसह सर्व १४ खलाशांना येमेनच्या तटरक्षक दलाने वाचवून त्यांना मोखा बंदरात सोडले आहे. येमेनच्या जवळ भारतीय जहाजावर मोठा भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जहाज समुद्रात बुडाले आहे. या महत्वाची गोष्ट म्हणजे जहाजातील १३ भारतीय खलाशांसह १४ जणांना सुरक्षित वाचवले आहे. येमेन कोस्ट गार्डने रेस्क्यू ऑपरेशन राबवत या सर्व खलाशांना वाचवत त्यांच रवानगी मोखा बंदरात केली आहे. इराण आणि अमेरिकेचे युद्ध थांबण्याचे काही नाव घेत नसल्याचे दिसत आहे. येमेन येथील समुद्रात एका भारतीय जहाज MSV फैझ नूरे औलियाला एका प्रोजेक्टाईन टार्गेट करण्यात आले. टक्कर झाल्यानंतर या जहाजाचे संतुलन बिघडले आणि ते समुद्रात उलटले. त्यामुळे हे जहाजात बुडाले आहे. या संदर्भात भारताने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. जलमार्ग मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री सर्बानंदर सोनोवाल यांनी सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर या संदर्भात पोस्ट करीत या घटनेची माहिती दिली आहे. या हल्ला उकसवणारा असल्याचे म्हणत या घटनेचा कठोर शब्दात निषेध करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे निवदेन परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे, त्यात ते म्हणतात की “४ ऑगस्ट २०२६ रोजी येमेन किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या ‘एमएसव्ही फैज नूर ओलिया’ या व्यापारी जहाजावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जहाजावरील सर्व १३ भारतीय नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. रियाधमधील आमचा दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी येमेनी अधिकाऱ्यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहे. येमेनी अधिकाऱ्यांच्या या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत आहोत.” निवदेनात पुढे म्हटले आहे की, ‘या भागात व्यापारी जहाजांवर सतत होत असलेले हल्ले खूप चिंताजनक आहेत. या भागात कमर्शियल जहाजांना लक्ष्य करणे बंद व्हायला पाहीजेत. आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या भागात आंतरराष्ट्रीय जलमार्गातून जहाजांची येजा आणि व्यापार कोणत्याही व्यत्यया विना लवकरात लवकर बहाल व्हायला हवा’ हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग यापूर्वी २० जुलै रोजी, हुथी बंडखोर गटाने सौदी अरेबियाविरुद्ध ‘नौदल नाकेबंदी’ जाहीर केली, ज्यामुळे रियाधने आपल्या जहाजांना लक्ष्य करणाऱ्या धमक्यांना तीव्र प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. बाब अल-मंदेब सामुद्रधुनी तांबड्या समुद्राला एडनच्या आखाताशी आणि अरबी समुद्राशी जोडते आणि हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग आहे.

COMMENTS