Homeताज्या बातम्या

शिष्यवृत्ती परीक्षेत रिशिता सोने हिचे उल्लेखनीय यश

कुंडलवाड: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बिलोली येथील लिट्ल फ्लॉव

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स; महसूल मंत्री बावनकुळे यांचे कठोर कारवाईचे संकेत
केरळमध्ये पूर आणि भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू; इडुक्की, कोट्टायमसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका
पाकिस्तानात पोलीस स्टेशनबाहेर भीषण आत्मघाती स्फोट; ८ पोलिसांसह १४ ठार, २२ जण गंभीर जखमी

कुंडलवाड: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बिलोली येथील लिट्ल फ्लॉवर कॉन्व्हेंट शाळेतील इयत्ता सातवीत शिकणार्‍या रिशिता निरंजन सोने हिने घवघवीत यश संपादन केले आहे. रिशिताने 289 पैकी 164 गुण मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता प्राप्त केली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांकडून तिचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. रिशिता निरंजन सोने ही बिलोली तालुक्यातील नागापूर येथील रहिवासी असून, के. पी. सोने माजी शिक्षणाधिकारी यांची नात आहे. तिच्या यशामुळे कुटुंबीयांसह नागापूर व बिलोली परिसरात कौतुक व अभिनंदनाचा र्षाव होत आहे.

COMMENTS