माहूर: किनवट माहुर तालुक्यातील शेतकर्यांच्या प्रलंबित विम्याची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी अशी मागणी किनवट माहुर विधानसभा मतदारसंघाचे विकासपु
माहूर: किनवट माहुर तालुक्यातील शेतकर्यांच्या प्रलंबित विम्याची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी अशी मागणी किनवट माहुर विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष आमदार भीमराव केराम यांनी दिनांक 27जुलै 2026रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती.त्यांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधीत विभागाला प्रलंबित विम्याची रक्कम तात्काळ शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार किनवट माहुर मतदार संघातील इस्लापूर ,शिवनी,बोदडी,मांडवी, सिंदखेड, वाई, वानोळा, मंडळातील शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून आमदार भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. किनवट माहुर या आदिवासी बंजारा बहुल मतदारसंघातील शेतकऱी प्रलंबित विम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता पिकविम्याची रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी यासाठी शेतकर्यांनी बँकेचे उंबरठे झिजविले होते परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाले होते. याबाबत आमदार भीमराव केराम यांनी जातीने लक्ष घालून शासनदरबारी पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रलंबित पिक विम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आमदार भीमराव केराम यांनी शासनदरबारी पाठपुरावा करुन विम्याची रक्कम मिळवून दिला त्याबद्दल शेतकर्यांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.

COMMENTS