Homeताज्या बातम्या

महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

बीड : माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालय, बीड येथे माऊली विद्यापीठ, केज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अ

लव्हुरीत शिक्षणासाठी ग्रामस्थांचा एल्गारशिक्षकांच्या रिक्त पदांवरून श्री. बडेबाबा विद्यामंदिरला ठोकले टाळे
अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक


बीड : माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालय, बीड येथे माऊली विद्यापीठ, केज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अशोकराव पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दि. 3 जून 2026 रोजी आयोजित कार्यक्रमात माऊली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष मा. नवनाथराव थोटे आणि सहप्रशासकीय अधिकारी मा. श्रीरंग निंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना नवनाथराव थोटे यांनी अशोकराव पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी शैक्षणिक संस्थांची स्थापना केली असून या संस्थांमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी समाजहिताचे अनेक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवला असल्याचे नमूद करत, पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना स्थापनेमुळे परिसरातील शेतकर्‍यांना मोठा लाभ झाला. पूर्वी उत्पादनक्षम नसलेल्या भागात उद्योग उभारून रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना दिली, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी अशोकराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS