Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादानंतर पत्नीलाच कारखाली चिरडले; बारामती येथील दाम्पत्यांचे कर्नाटकात येथील वादातून हत्या

बारामती/कलबुर्गी : कौटुंबिक वादाने टोक गाठल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात उघडकीस आली असून, पतीने आपल्या 28 वर्षीय पत्नीची अम

शिवाजी ओहोळ यांचे निधन
बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी : मुख्यमंत्री फडणवीसविरोधकांनी मन मोठं करण्याचा सल्ला; काँगे्रस उमेदवार देण्यावर ठाम
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा भाजपला शह; प्रदूषण नियत्रंण मंडळाचे कार्यालय पुण्याहून बारामतीला हलवले

बारामती/कलबुर्गी : कौटुंबिक वादाने टोक गाठल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात उघडकीस आली असून, पतीने आपल्या 28 वर्षीय पत्नीची अमानुषपणे हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्यामध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट क्रूर हत्येत झाल्याने समाजमन हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील हे दाम्पत्य कर्नाटकातील गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. प्रवासादरम्यान बल्लुरगी गावाजवळ पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका तीव्र झाला की संतापाच्या भरात पतीने पत्नीला धावत्या कारमधून खाली ओढले आणि रस्त्यावरच तिच्यावर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळ आरोपी शांत असल्याचे भासवत होता. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण काही स्थानिकांनी आपल्या मोबाईलवर केले आहे. मात्र नागरिक बाजूला होताच आरोपीने क्रूरतेची परिसीमा गाठली. मारहाणीमुळे रस्त्याच्या कडेला पडलेल्या पत्नीवर त्याने थेट कार चालवून तिला चिरडले. गंभीर जखमांमुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने उपस्थित नागरिक सुन्न झाले. प्राथमिक माहितीनुसार, पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने हे कृत्य केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तपास यंत्रणांच्या मते, ही घटना केवळ क्षणिक संतापातून घडलेली नसून पूर्वनियोजनाचा कोनही तपासला जात आहे. या घटनेमुळे कौटुंबिक वादांच्या वाढत्या तीव्रतेबाबत गंभीर प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

COMMENTS