Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक खरातकडून कोल्ड रिडिंग-हॉट रिडिंग कोडचा वापर; एसटायटीच्या तपासात भोंदूगिरीचे अनेक प्रताप समोर

अहिल्यानगर : भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात तपास पुढे जात असताना नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथक

नवी मुंबईतून जप्त केली तब्बल १२५ कोटींचे हेरॉईन (Video)
Mumbai : विचित्र पद्धतीने वाढदिवस साजरा (Video)
रशियातील ग्रंथालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा; विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संस्थेचे अभिनंदन

अहिल्यानगर : भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात तपास पुढे जात असताना नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथकाने खरातच्या कार्यालयावर मोठी कारवाई करत पंचांच्या उपस्थितीत ते ठिकाण सील केले. यावेळी तांत्रिक पथकाने सखोल पाहणी करून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि उपकरणे ताब्यात घेतली असून तपासाला वेग आला आहे.
न्यायालयाने अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात त्याची कसून चौकशी सुरू असून, त्याच्या कार्यपद्धतीबाबत नवे पैलू समोर येत आहेत. लोकांची फसवणूक करण्यासाठी तो आधीच माहिती गोळा करत असल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. संबंधित व्यक्तीचे नातेवाईक, मित्रपरिवार, वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार याची माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र जाळे कार्यरत असल्याचेही प्राथमिक चौकशीत दिसून आले आहे. तपासादरम्यान खरातकडून ‘कोल्ड रिडिंग’ आणि ‘हॉट रिडिंग’ या मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. ‘हॉट रिडिंग’मध्ये व्यक्तीबद्दलची माहिती आधीच मिळवून त्याचा प्रभावी वापर केला जातो, तर ‘कोल्ड रिडिंग’मध्ये समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया, बोलणे आणि देहबोलीचा अंदाज घेत दिशाभूल केली जाते. या दोन्ही तंत्रांच्या साहाय्याने विश्‍वास संपादन करून लोकांना जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो प्रसारित केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव पोलीस ठाण्यात ही कारवाई झाली असून संबंधितांनी संदेशवहन गटांवर चित्रफीत प्रसारित केल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे पीडितांची ओळख उघड होईल अशी माहिती प्रसारित केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा तपास पथकाच्या प्रमुखांनी दिला आहे. याशिवाय, खरातकडे शस्त्र परवाना असल्याचेही समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी हा परवाना मंजूर झाला असून अलीकडेच त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. तपासादरम्यान त्याच्या फार्महाऊसवरून काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह

पोलीस कोठडीत असलेल्या खरातची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असून तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात आतापर्यंत उघडकीस आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिक पोलिसांकडे दाखल असलेल्या एकूण आठ गुन्ह्यांपैकी सात गुन्हे हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. मात्र, तक्रार दाखल केलेल्या महिलांव्यतिरिक्त अनेक पीडित महिला अद्याप पुढे आलेल्या नाहीत, ही बाब चिंताजनक मानली जात आहे.

COMMENTS