बीड: महाराष्ट्र राज्य रोल बॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या 16 व्या मिनी (11 वर्षांखालील) राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धा 2026 यवतमाळ य

बीड: महाराष्ट्र राज्य रोल बॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या 16 व्या मिनी (11 वर्षांखालील) राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धा 2026 यवतमाळ येथे तसेच 20 व्या सब-ज्युनियर (14 वर्षांखालील) महाराष्ट्र राज्य रोल बॉल चॅम्पियनशिप 2026 स्पर्धा सातारा येथे होणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी बीड जिल्हा रोल बॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय रोल बॉल स्पर्धा व संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी रविवार, दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथील रोल बॉल मैदानावर घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीतून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून तयार करण्यात आलेला संघ यवतमाळ व सातारा येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिनी गट (11 वर्षांखालील) साठी 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू, तर सब-ज्युनियर गट (14 वर्षांखालील) साठी 1 जानेवारी 2013 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू सहभागी होण्यास पात्र असतील. स्पर्धेसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील खेळाडू नोंदणी शुल्क प्रत्येकी 300 रुपये राहणार आहे. सहभागी संघांनी संबंधित गणवेशामध्ये उपस्थित राहणे आवश्यक असून, सर्व प्रकारची क्रीडा सुरक्षा साधने असणे बंधनकारक आहे. खेळाडूंनी सोबत जन्मदाखला, आधारकार्ड व दोन पासपोर्ट फोटो आणणे आवश्यक आहे. अशी माहिती बीड जिल्हा रोल बॉल असोसिएशनचे सचिव रामदास गिरी यांनी दिली. जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन बीड जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करावे, असे आवाहन प्रशिक्षक वैभव गिरी यांनी केले आहे.

COMMENTS