Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते

अजित पवारांच्या विधानांवर संभाजीराजेंचा संताप

पुणे ः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीमहाराज यांच्याविषयी केलेल्या एका विधानामुळे वादंग निर्माण झाला आहे. भाजप या विधानाचा निषेध

जन्मदात्या आईची डोक्यात दगड घालून हत्या | LokNews24
घर नको पण अटी आवर
सातारा पालिकेची अर्थसंकल्पीय आज होणार

पुणे ः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीमहाराज यांच्याविषयी केलेल्या एका विधानामुळे वादंग निर्माण झाला आहे. भाजप या विधानाचा निषेध करत आहे. अशातच आता छत्रपतींचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली आहे. संभाजीराजे सोमवारी माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, मी संभाजीमहाराज यांना स्वराज्यवीर, धर्मवीर असे नेहमीच म्हटले आहे.

अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन विधान केले, ते त्यांनी स्पष्ट करावे. ऐतिहासिक संदर्भ, घटना बोलायची असेल तर अभ्यास न करता प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवार अर्धसत्य बोलले, त्यांचे विधान चुकीचे. स्वराज्यरक्षक बोलले तर बरोबर आहे. पण धर्मवीर नव्हते हे चुकीचे आहे. अजित पवार यांनी सभागृहात बोलताना अभ्यास करुनच बोलायला हवे, असा सल्लाही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. तसेच संभाजीमहाराज स्वराज्यरक्षकही होते आणि धर्मवीरही होते, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या वक्तव्याबद्दल त्यांनी अजित पवारांचा निषेधही केला आहे.

अजित पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली – विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पवारांच्या देवगिरी शासकीय या निवासाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनाद करण्यात आला आहे. अजित पवार यांच्याविरोधात भाजपच्या अध्यात्मिक सेल कडून आंदोलन केलं जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS