Homeताज्या बातम्यादेश

झारखंडचे सोरेन सरकार बहुमत चाचणीत पास

47 आमदारांचा सरकारला पाठिंबा, 29 विरोधात

रांची : झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना ईडीने अटक करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीप

पुणे पालिकेतील समाविष्ठ 23 गावांचे प्रश्‍न सुटणार
पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळीच वंदे भारत ट्रेनवर दगडफेक
रेल्वे रुळावर थांबलेल्या ट्रकला रेल्वेची धडक… ट्रकचा झाला चकनाचूर… पहा थरारक व्हिडीओ

रांची : झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना ईडीने अटक करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांनतर सोरेन सरकारसमोर विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्याचे आव्हान होते, मात्र यात सोरेन सरकार पास झाले आहे.
सरकारच्या बाजूने 47 तर विरोधात 29 मते पडली. यापूर्वी चंपाई यांनी विश्‍वासदर्शक ठराव मांडला होता. चर्चेसाठी एक तास 10 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. 23 मिनिटांच्या भाषणात हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकार आणि भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले. म्हणाले की, देशात प्रथमच मुख्यमंत्र्यांना अटक झाली. त्यात राजभवनाचा समावेश आहे असे दिसते. जमीन हडपल्याची कागदपत्रे दाखवा, मी झारखंड सोडेन, राजकारण बाजूला ठेवा. दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर सोमवारीच झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ईडीचे उत्तर 9 फेब्रुवारीला हायकोर्टात दाखल केले जाणार आहे. पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार आहे. अटक आणि कोठडीला आव्हान देणारी याचिका हेमंत सोरेन यांच्या वतीने हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

तपास यंत्रणांचे एका पक्षासाठी काम ः सोरेन – मुख्यमंत्री चंपाई सोरेन म्हणाले की, खूप काही करायचे आहे. हेमंत सोरेन यांच्या सरकारचे काम पुढे न्यायचे आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करणे आवश्यक आहे. केंद्रीय एजन्सीमध्येही पारदर्शकता असायला हवी. हेमंत सोरेन यांच्याबाबतीत भेदभाव होता कामा नये. मात्र तपास यंत्रणा एका पक्षासाठी काम करत आहे, ही चिंतेची बाब असल्याचे चंपाई सोरेन यांनी म्हटले आहे.

COMMENTS