Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नसरापूर घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट; आरोपीला 7 मे पर्यंत सुनावली पोलिस कोठडी

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या अमानुष घटनेनंतर राज्यभर तीव्र संताप व्यक्त होत असून नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि रोषाचे वातावरण नि

एमएसईबी सबस्टेशनवरील जबरी चोरी उघड; तिघे जेरबंद, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपुरात 5 लाखांची लाच घेणार्‍या अधिकार्‍याला अटक
खिडकीतून पळ काढणार्‍या आरोपीला काही तासांतच पुन्हा अटक; शिवाजीनगर पोलिसांची तत्पर कारवाई
Nasrapur Minor Rape Murder Accused Gets Police Custody Till May 7

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या अमानुष घटनेनंतर राज्यभर तीव्र संताप व्यक्त होत असून नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला रविवारी पुणे न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी ’भांडणातून गोवल्याचा’ धक्कादायक बनाव रचला, मात्र पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत त्याला पोलिस कोठडीत पाठवले आहे.
विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी ’भांडणातून गोवल्याचा’ धक्कादायक बनाव रचला, मात्र पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत त्याला पोलिस कोठडीत पाठवले आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे उत्तर देत म्हटले की, किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे. आपल्या कृत्याचा कोणताही पश्‍चात्ताप त्याच्या चेहर्‍यावर दिसत नव्हता. मात्र, तपासातील निष्पन्न तथ्ये आणि चिमुकलीचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला, त्यावरून त्याचा हा बनाव न्यायालयात टिकू शकला नाही.
दरम्यान, शनिवारी आरोपीवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी नसरापूरमधील ग्रामस्थ आणि पीडितेचे नातेवाईक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. नवले पुल परिसरात त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. आंदोलकांना समजावून सांगत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शनिवारी उशिरा रात्री शोकाकुल वातावरणात चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण समाजमन हेलावून गेले असून, दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

आरोपीच्या कठोर शिक्षेसाठी प्रयत्न : मुख्यमंत्री फडणवीस
नसरापूर येथील घटनेनतंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली असून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याबाबत ठोस आश्‍वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी पीडित मुलीच्या वडिलांशी दोन वेळा दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. या संवादातून कुटुंबाच्या वेदना आणि भावना समजून घेतल्या असून, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्‍वास त्यांनी दिला. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, विशेषतः मृत्युदंड व्हावा यासाठी शासन कोणतीही त्रुटी राहू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


न्याय मिळेपर्यंत कुणीही सांत्वनासाठी येऊ नये : पीडितेच्या वडिलांचे आवाहन
या पार्श्‍वभूमीवर पीडित चिमुकलीच्या वडिलांनी अत्यंत वेदनादायी शब्दांत आपली भूमिका मांडत, न्याय मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने सांत्वनासाठी घरी येऊ नये, असे स्पष्ट आवाहन केले आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना विविध राजकीय पक्षांचे नेते भेटीसाठी येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. मात्र, अशा भेटींपेक्षा आपल्या मुलीला न्याय मिळणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

COMMENTS