माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगरपंचायतीची कामगिरी सर्वोत्तम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगरपंचायतीची कामगिरी सर्वोत्तम

प्रशासक गोविंद शिंदे व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचा पर्यावरण दिनी शासनाच्या वतीने होणार सन्मान

शिर्डी : माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्

नगरचे रस्ते विकासाला डांबर दरवाढीची खीळ
पोलिस कारवाईनंतरही कोतुळमध्ये मटका सुरूच
कुळधरणच्या उत्सवात दोघांना जबर मारहाण

शिर्डी : माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. माझी वसुंधरा अभियान २.० मधील नगर पंचायत गटांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नगरपंचायत मध्ये शिर्डी नगरपंचायतीच्या समावेश झाला आहे. शिर्डी नगरपंचायतीचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी केलेल्या या कामगिरी बाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांचे वतीने प्रशासक व मुख्याधिकारी यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा रविवार, ५ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षतेखाली, उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत टाटा थिएटर, एन.सी.पी.ए., नरीमन पाईट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती माझी वसूंधरा अभियान संचालनालयाचे अभियान संचालक सुधाकर बोबडे यांनी दिली आहे.

COMMENTS