Homeताज्या बातम्या

दोन सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

सोनई :  सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करूनही त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सोनई पोलिसांनी ठोस पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवतेज ऊर्फ अमोल शिवाजी जावळे (वय ३०, रा. पिंपळगाव रोड, चांदा) याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, अवैध शस्त्र बाळगणे, फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच सौरभ ऊर्फ शेंग्या अशोक गजभिव (वय २३, रा. राजवाडा, सोनई) याच्याविरुद्ध मारामारी, घरफोडी, दंगा, दरोडा, गंभीर दुखापत, शिवीगाळ व धमकावणे अशा विविध गुन्ह्यांची नोंद आहे.या दोघांना अनेक वेळा अटक करूनही त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत बदल झाला नाही. उलट ते सातत्याने गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जिल्ह्यातील शांतता व सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या निर्देशानुसार सोनई पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकारी, नगर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची छाननी करून उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू यांनी हद्दपारीची शिफारस केली. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी शिवतेज ऊर्फ अमोल शिवाजी जावळे यास तीन महिन्यांसाठी, तर सौरभ ऊर्फ शेंग्या अशोक गजभिव यास दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश पारित केला. आदेशानुसार दोघांनाही जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे.

माहिती अधिकार कायद्यातील नव्या नियमांवर आक्षेप कायम; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलनावर ठाम
अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यासाठी बालविकास प्रकल्पवर मोर्चा
रस्त्यात अडवून तरुणीचा विनयभंग

Dharashiv crime : सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून एक वर्षाकरीता तडीपार

COMMENTS