Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्म दाखल्यासाठी ३ हजारांची लाच; जामखेड नगरपरिषदमधील घटना; दोघांना तीन दिवसांची कोठडी

जामखेड : जन्म दाखला देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जामखेड नगरपरिषदमधील  लिपिक अभिजीत भैसडे व अहमद शेख  यांना दि. ६ मे रोजी अटक करण्यात आली होती. दि ७ मे रोजी त्यांना सत्र न्यायालय श्रीगोंदा येथे हजर केले असता करण्यात आले. न्यायालयाने  तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत नगरपरिषदेतील लिपिक अभिजीत जालिम भैसडे व अहमद शेख यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. फिर्यादीकडून जन्म दाखला देण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणामुळे जामखेड नगरपरिषदेत खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांकडून विविध दाखल्यांसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

28 लाखांच्या लाचप्रकरणी महिला पोलिस अधिकारी निलंबित
पर्वतीत नराधम आजोबाचे नातीवर अत्याचार करण्याचे धाडस; शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण!
सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक

जामखेड : जन्म दाखला देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जामखेड नगरपरिषदमधील  लिपिक अभिजीत भैसडे व अहमद शेख  यांना दि. ६ मे रोजी अटक करण्यात आली होती. दि ७ मे रोजी त्यांना सत्र न्यायालय श्रीगोंदा येथे हजर केले असता करण्यात आले. न्यायालयाने  तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत नगरपरिषदेतील लिपिक अभिजीत जालिम भैसडे व अहमद शेख यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. फिर्यादीकडून जन्म दाखला देण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणामुळे जामखेड नगरपरिषदेत खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांकडून विविध दाखल्यांसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

COMMENTS