Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष कारावास व 5.50 लाखांचा दंड

अंबाजोगाई : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपी श्रीराम सखाराम नाईकवाडे (रा. पिंपळगाव घाट, ता. जिल्हा बीड) यास अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स

क्रेडाईच्या वतीने कामगार कल्याण सप्ताहाचे आयोजन;श्रमिक सन्मान – आपले योगदान, आमचा अभिमान अंतर्गत विविध उपक्रम राबविणार-अंबाजोगाई क्रेडाईचे अध्यक्ष संजय सुराणा
अंटार्क्टिका ही मंत्रमुग्ध करणारी सफर आहे : डॉ.मधुबाला जोशी (चिंचाळकर)
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी 90 कोटींचा निधी मंजूर; खा.बजरंग सोनवणेंनी मानले आभार, 15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींचा होणार कायापालट

अंबाजोगाई : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपी श्रीराम सखाराम नाईकवाडे (रा. पिंपळगाव घाट, ता. जिल्हा बीड) यास अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर-3 यांनी एक वर्ष कारावास व 5 लाख 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी की, आशिकी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2008-09 साठी ऊसतोड व वाहतूक ठेकेदारांशी करार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यावेळी आरोपी श्रीराम नाईकवाडे यांनी स्वतः वाहन मालक असल्याचे सांगून कारखान्याच्या कार्यालयात दोन साक्षीदारांसमक्ष करार केला. करारानुसार गळीत हंगाम पूर्ण होईपर्यंत ऊसतोड वाहतूक मुकादम म्हणून काम करून कारखान्यास ऊस पुरवठा करण्याचे मान्य करण्यात आले. आरोपीच्या मागणीनुसार फिर्यादी कारखान्याने त्यास 1 लाख 75 हजार रुपये उचल स्वरूपात दिले. मात्र, आरोपीने करारानुसार गळीत हंगाम 2008-09 मध्ये कारखान्यास कोणताही ऊस पुरवठा केला नाही. त्यामुळे कारखान्याने उचल रक्कम व त्यावरील व्याज मिळून एकूण 3 लाख 32 हजार 500 रुपयांची मागणी आरोपीकडे केली. त्या अनुषंगाने आरोपीने अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, शाखा अंबाजोगाई येथील स्वतःच्या खात्याचा धनादेश क्रमांक 627486, रक्कम 3 लाख 32 हजार 500 रुपये, फिर्यादी कारखान्यास दिला व तो वटेल असा विश्वास दिला. सदर धनादेश फिर्यादी कारखान्याने 28 फेब्रुवारी 2018 रोजी बँकेत जमा केला असता, आरोपीच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने धनादेश नामंजूर झाला. त्याबाबत बँकेने 1 मार्च 2018 रोजी मेमो दिला. यानंतर फिर्यादी कारखान्याने 20 मार्च 2018 रोजी आरोपीस कायदेशीर नोटीस पाठवून धनादेशावरील रकमेची मागणी केली. मात्र, नोटीस मिळूनही आरोपीने रक्कम अदा केली नाही. त्यामुळे फिर्यादी कारखान्याने आरोपीविरुद्ध दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर-3 यांच्या न्यायालयात एस.एस.सी. क्रमांक 397/2018 असा दावा दाखल केला. सदर प्रकरणात फिर्यादी कारखान्याच्या वतीने लालासाहेब इंगळे व गोवर्धन पवार यांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच सादर करण्यात आलेले कागदपत्रीय पुरावे व तोंडी साक्षी, तसेच फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी श्रीराम सखाराम नाईकवाडे यास एक वर्ष कारावास व 5 लाख 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. फिर्यादी कारखान्याच्या वतीने अ‍ॅड. प्रवीण योगीराज मेटे यांनी काम पाहिले.

COMMENTS