Homeताज्या बातम्या

नान्नज बंदला गावकऱ्यांचा प्रतिसाद

जामखेड : जामखेड तालुक्यातील नान्नज येथे बसस्थानकासह विविध विकास कामांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शहाजी राजेभोसले यांचे चार दिवसांपासून उपोषण सुरू

‘शेत पाणंद’च्या सहअध्यक्षपदी अशोक खेडकर; कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती
अरणगाव येथे रविवारी भव्य रथयात्रा; आषाढी एकादशी व द्वादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
विद्यार्थी आंदोलनात लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? खासदार राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्राद्वारे सवाल

जामखेड : जामखेड तालुक्यातील नान्नज येथे बसस्थानकासह विविध विकास कामांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शहाजी राजेभोसले यांचे चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणला पाठिंबा म्हणून गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी दि. ९ ऑगस्ट रोजी गाव कडकडीत बंद ठेऊन जाहीर पाठिंबा दिला. नान्नज बंदला व्यापाऱ्यांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असुन गावकऱ्यांची एकता हीच आपली ताकद आहे असे दाखवून दिले आहे.

नान्नज गावाच्या अनेक वर्षांपासून बसस्थानक, बँक, रस्ते, पाणी, या मागण्या आहेत .या सार्वजनिक विकासाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शहाजीराजे भोसले उपोषणास बसले आहेत त्या मुळे नान्नज ग्रामस्थ सह आजुबाजुच्या गावातील गावकऱ्यांनी उपोषणला जाहीर पाठिंबा दिला आहे.

नागरी सुविधांचा प्रचंड अभाव आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यांमुळे संपूर्ण परिसराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे नान्नज येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे, तसेच शेतकरी, लहान व्यापारी, वृद्ध व तरुणांच्या सोयीसाठी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ किंवा ‘बँक ऑफ महाराष्ट्र’सारख्या राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, अशा मागण्या उपोषणकर्ते राजेभोसले यांनी केल्या आहेत.

प्रशासनाने लवकरात लवकर उपोषण आंदोलनाची दखल घेऊन तोडगा काढावा अन्यथा जामखेड – करमाळा रोडवर रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारयांसह नागरिकांनी दिला आहे.नान्नज बंदच्या पार्श्वभूमीवर कोणातही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, पोलीस कॉ. काळाणे, पोलीस कॉ. जाधव यांनी नान्नज गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS