Homeताज्या बातम्या

एलपीजी ग्राहकांनी 15 ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांनी आपल्या गॅस जोडणीची ई-केवायसी प्रक्रिया 15 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन

ज्येष्ठांसाठी १५ कलमी ’हक्क चार्टर’ लागू करा; डॉ. हंसराज वैद्य यांची केंद्र व राज्य शासनाकडे आग्रही मागणी
कोपरगाव-निफाड परिसरातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मंजुरी; आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, ७.२९ कोटींचा निधी मंजूर
गोदावरीतून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह वाळू जप्त
How to Complete LPG Gas Cylinder EKYC Online at Home via Mobile: LPG गॅस  सिलिंडरची E-KYC सोप्या पद्धतीने घरी बसून करा, कुठेही जाण्याची गरज नाही।  Maharashtra Times

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांनी आपल्या गॅस जोडणीची ई-केवायसी प्रक्रिया 15 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे. गॅस पुरवठा नियमित आणि सुरळीत राहण्यासाठी ग्राहकांनी विहित मुदतीत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ई-केवायसीसाठी ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅस एजन्सीमध्ये आधार कार्ड आणि गॅस पासबुक घेऊन जावे. संबंधित एजन्सीवर बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याच्या ठशाद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये जाण्याची आवश्यकता नसून घरबसल्या अधिकृत मोबाईल पद्वारेही ई-केवायसी करता येणार आहे. यासाठी संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत इंडियनऑइल वन, भारतगॅस किंवा एचपी पे यांसारखे मोबाईल प वापरता येतील. आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून, यासाठी ग्राहकांनी कोणत्याही व्यक्तीला अथवा गॅस एजन्सीला अतिरिक्त शुल्क देऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ई-केवायसीच्या नावाखाली कोणी शुल्काची मागणी केल्यास ग्राहकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 15 ऑगस्टची अंतिम मुदत जवळ आल्याने शेवटच्या दिवसांत गॅस एजन्सींवर ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ आणि गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी 15 ऑगस्टपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांनी या प्रक्रियेला प्रतिसाद देऊन आपली ई-केवायसी वेळेत पूर्ण करावी आणि गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

COMMENTS