तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथे गावातील विविध मान्यवर व्यक्ती तसेच गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. आदर्

तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथे गावातील विविध मान्यवर व्यक्ती तसेच गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. आदर्शगाव वंजारवाडीचे सरपंच श्री. वैजिनाथ नाना तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र किल्ले भगवान गड मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास गावातील महिला, पुरुष, युवा बांधव व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री. भास्कर दादा तांदळे तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. अंकुश आण्णा खाडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. तसेच केंद्रप्रमुख परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल श्री. उपेंद्र तांदळे सर यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. पोलीस पाटील पदाच्या परीक्षेत निवड झाल्याबद्दल श्री. सतीश विठ्ठल खाडे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. याशिवाय इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या तसेच 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांमध्ये नेहा नारायण शेंडगे (96.40%), गीता लक्ष्मण तांदळे (94.40%), ऋषिकेश विठ्ठल तांदळे (92.00%), सृष्टी संजय तांदळे (91.00%), प्रिया प्रकाश तांदळे (90.80%), ओमकार हनुमान तांदळे (90.80%), संकेत शाहू तांदळे (तृतीय क्रमांक) व पृथ्वीराज जालिंदर शेंडगे यांचा समावेश होता. यावेळी लक्ष्मणराव पवार, पांडुरंग नाना राख, नागरगोजे सर, शहादेव नाना, सुभाष झांझुर्णे, नामदेव झांझुर्णे, विठ्ठल आप्पा, सोपान तांदळे, ओमकार कांबळे, आचन महाराज, गजानन महाराज, डॉ. संजय तांदळे, प्रकाश तांदळे, संतोष तांदळे, जालिंदर शेंडगे, गणेश तांदळे, नारायण शेंडगे, तात्याराम बापू, नंदू पवळ, भगवान चव्हाण, ज्ञानोबा झांझुर्णे, आबू सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोमेश तांदळे सर यांनी केले.

COMMENTS