Homeताज्या बातम्यामनोरंजन

पॉप सिंगर शकीराला होऊ शकते ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ?

कोलंबिया - जगप्रसिद्ध गायिका आणि डान्सर शकिरा ही एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. टॅक्स प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी तिला कोर्टानं हजर

खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची `दिवाळी काळी’ (Video)
ब्रिटनमधील बर्मिंगहॅम शहर दिवाळखोर घोषित
चांद्रयान 3 मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा समावेश

कोलंबिया – जगप्रसिद्ध गायिका आणि डान्सर शकिरा ही एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. टॅक्स प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी तिला कोर्टानं हजर राहण्याचे समन्स बजावले होते मात्र तिनं टाळाटाळ केल्यानं तिला मोठ्या प्रकरणाला सामोरं जावं लागलं आहे. ग्लोबल पॉप स्टार शकिराच्या नावाची क्रेझ मोठी आहे. जगभरामध्ये तिचे चाहते मोठे आहेत. भारतातही शकिराचा चाहतावर्ग आहे. आपल्या गाण्यानं आणि नाचण्यानं शकिरानं मोठी ओळख निर्माण केली आहे. आजवर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये शकिराचा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही तिच्या नावाची चर्चा आहे. तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या कित्येक लाखांच्या घरात आहे. कोलंबियाची पॉप स्टार शकीरा ही सध्या ग्लोबल स्टार आहे. शकीरा सध्या चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या गाण्यामुळे नाही तर एका फसवणूक प्रकरणामुळे. शकीराच्या सध्या अडचणीमध्ये आहे. टॅक्स म्हणजेच कर फसवणूक प्रकरणी शकीराला सोमवारी बार्सिलोना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. मियामीमध्ये राहणारी 46 वर्षीय कोलंबियन स्टार शकीरा दोषी आढळल्यास तिला आठ वर्षांचा तुरुंगवास आणि 24 दशलक्ष युरो ($24 दशलक्ष) दंड भरावा लागू शकतो, असे द गार्डियनने वृत्त दिले आहे. या प्रकरणामध्ये शकीरा आतापर्यंत स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत आली आहे. पण आता थेट कोर्टानेच समन्स बजावल्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता शकीराला स्पेन सरकारला कोट्यवधीची रक्कम भरावी लागणार आहे. हे पैसे देण्यासाठी ती आतापर्यंत टाळत होती.

हे संपूर्ण प्रकरण असे आहे की, 2012 ते 2014 पर्यंत शकीराने स्पॅनिश रहिवासी म्हणून सहा महिन्यांहून अधिक काळ घालवला. या काळामध्ये तिने कर भरणे अपेक्षित होते. पण तिने कर भरला नाही. पण तिने कर भरल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत, ती स्पेनची रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी, फिर्यादीने 117 साक्षीदारांना बोलावले आहे. ज्यात केशभूषाकार, स्टुडिओ तंत्रज्ञ, नृत्य शिक्षक, डॉक्टर, ब्युटीशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि तिचा ड्रायव्हर यांचा समावेश आहे. शकीराचे हे कर फसवणूक प्रकरणी २०१८पासून चर्चेत आहे.

अशा परिस्थितीत शकीरा त्यावेळी कुठे राहत होती हे अद्याप निश्चित झालेले नाही. कोलंबियन पॉप स्टारने कर फसवणूक केल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. दरम्यान, शकीराचे अधिकृत निवासस्थान अजूनही बहामासमध्ये आहे. बहामासमधील कराचे दर स्पेनच्या तुलनेत खूपच कमी आहेत.

COMMENTS