Homeताज्या बातम्या

‘शेत पाणंद’च्या सहअध्यक्षपदी अशोक खेडकर; कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती

कर्जत: कर्जत येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांची महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत

किनवटचा ’कोंडवाडा’ आणि प्रशासनाचे ’बधिर’ मौन! मोकाट गाढवे व खेचरांमुळे नागरिक त्रस्त, आंदोलनाचा इशारा
मुंबई महापालिकेला तुकाराम मुंढेंचा दणका; पालिका मुख्यालयातील कँटीन केले सील!
हजूर साहिब गुरुद्वारा कायद्यातील बदलास मनबीरसिंघ ग्रंथी यांचा विरोध; राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध शीख समाज आक्रमक
More Vote Verification for a Better Democracy? - Supreme Court Observer

कर्जत: कर्जत येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांची महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने’च्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाचे कार्यासन अधिकारी प्रतापसिंह खरात यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र जाहीर केले आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेतीपर्यंत पोहोचणारे पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. शेतीमालाची वाहतूक, कृषी यंत्रसामग्रीची ने-आण तसेच आपत्कालीन परिस्थितीत शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेच्या कामकाजाला अधिक गती मिळावी आणि स्थानिक पातळीवरील अडचणी तातडीने मार्गी लागाव्यात, या उद्देशाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी सहअध्यक्षांची नियुक्ती करण्यात येत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी ही जबाबदारी अशोक खेडकर यांच्यावर सोपविण्यात आल्याने परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

नियुक्तीनंतर बोलताना अशोक खेडकर म्हणाले, “विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. महायुती सरकार आणि विशेषतः महसूल विभागाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रभावी प्रयत्न सुरू आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवून प्रत्येक गावातील पाणंद रस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे.”

अशोक खेडकर यांच्या निवडीबद्दल त्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी सभापती अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, काकासाहेब धांडे, मेघनाथ पाटील, उपसभापती आबासाहेब पाटील, प्रा. शिवाजीराव धांडे, नानासाहेब सोनमाळी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS