Homeताज्या बातम्या

सो. के. एस. के. महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य्  महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव न

वसंतराव नाईकांनी राज्यात हरितक्रांती घडवली – राजेंद्र आमटेकृषी दिनी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने अभिवादन
तुलसी महाविद्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादनहरितक्रांतीच्या जनकाला पुष्पहार अर्पण; मान्यवरांची उपस्थिती



सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य्  महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती (कृषी दिन) अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (छडड) आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी  वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान, जलसंधारणाचे काम आणि त्यांनी घडवलेली हरितक्रांती याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. वसंतराव नाईक यांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. शेती या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. संजय पाटील देवळानकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे,   पदव्युत्त्र  विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस. कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.  पी. आर. वाणी, प्रा. जयंत साठे, तसेच  प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना फटाले यांनी केले तर प्रास्ताविक व आभार डॉ. बी. एम. मंडलीक यांनी मानले.

COMMENTS