नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 1 जुलै) स

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 1 जुलै) सकाळी नागार्जुना पॉईंट येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर कविता मुळे आणि पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला असून, हरितक्रांतीचे जनक आणि राज्याचे पहिले शेतकरी मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कृषी विकासातील मोलाच्या योगदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी 1 जुलै हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी – पाटील, माजी सभापती किशोर स्वामी, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपआयुक्त स. अजितपालसिंग संधु, क्षेत्रीय अधिकारी तथा उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, क्षेत्रीय अधिकारी राजेश जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS