Homeताज्या बातम्या

सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात 3,179 बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण यशस्वी..शंभर टक्के लसीकरणासाठी प्रभावी नियोजन; डीटीओ डॉ.माने यांच्याकडून कौतुक..

तालुक्यातील सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली.वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख

नागरी रुग्णालय अंबाजोगाई येथे बिन टाका शस्त्रक्रिया शिबिरात 35 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
नातेवाईकांवर कारवाई, पण तंबाखू खाऊन ड्युटी करणार्‍या कर्मचार्‍यावर मेहरबानी का?
किनवट तालुक्यात नियमांची ऐशीतैशी; उघड्यावरील मांस विक्रीमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात!’एसी’तील प्रशासनाच्या डोळेझाक धोरणामुळे महामारीची टांगती तलवार; अन्न सुरक्षा कायद्याला हरताळ.



तालुक्यातील सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली.वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख महेविशआरा व डॉ.शेख फबिया यांच्या प्रभावी नियोजनामुळे 43 लसीकरण बूथ आणि 2 मोबाईल पथके कार्यरत ठेवण्यात आली.या मोहिमेत एकूण 3,179 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली.
या मोहिमेची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य शिवम दिगंबर घोडके यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून करण्यात आली. मोहिमेदरम्यान बीड जिल्हा क्षयरोग अधिकारी (डीटीओ) डॉ.माने यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कामाची पाहणी केली. लसीकरणाचे उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी बद्दल त्यांनी दोन्ही वैद्यकीय अधिकार्‍यांसह संपूर्ण कर्मचार्‍यांचे कौतुक केले. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी एक असलेल्या सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात तब्बल 44 गावांचा समावेश आहे. प्रत्येक गाव आणि वस्तीपर्यंत लसीकरण पोहोचावे यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या.सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर रामचंद्र घोडके यांनीही घराघरांत जाऊन नागरिकांशी संपर्क साधत मोहिमेला सक्रिय सहकार्य केले. लसीकरणासाठी गावातील व परिसरातील नागरिकांनी आपल्या लहान मुलांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पोलीस पाटील शुभम पांडुरंग घोडके यांच्यासह आरोग्य विभागाचे श्री.तेरोले,श्री.सरोदे,भैर,सानप, श्रीमती पडोळे, गायकवाड, घोडके, गुगळे मॅडम आणि इतर सर्व कर्मचारी उपस्थित राहून राष्ट्रीय मोहिमेच्या यशासाठी परिश्रम घेत होते.
उत्कृष्ट नियोजनामुळे मोहिमेला यश….
3,179 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली.याठिकाणी 43 लसीकरण बूथ व 2 मोबाईल पथके कार्यरत होती.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात 44 गावांचा समावेश असताना डॉ.शेख महेविशआरा व डॉ.शेख फबिया यांच्या नियोजनाचे डीटीओ डॉ.माने यांनी कौतुक केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असून. पोलिओमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचे दोन थेंब द्यावेत, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य शिवम दिगंबर घोडके यांनी केले.

COMMENTS