Homeताज्या बातम्या

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त अंजनवती येथे शेकडो शेतकर्‍यांना मोफत खत वाटप

बीड : महाराष्ट्र कृषी दिन तसेच हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त बीड तालुक्य

मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरपुढील दोन-तीन दिवसांत आगमनाची शक्यता
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द करा या मागणीसाठी किसान सभेची निदर्शने
शाँर्ट सर्किटमुळे केसर आंब्याची बाग जळुन खाकआष्टी तालुक्यातील बीड सांगवी – गणगेवाडी येथील घटना; शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान


बीड : महाराष्ट्र कृषी दिन तसेच हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त बीड तालुक्यातील अंजनवती येथे शेकडो शेतकरी बांधवांना मोफत खताचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम बीड येथील समाजसेवक तथा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष मा. जावेद भैया कुरेशी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
शेतकरी हिताला प्राधान्य देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला परिसरातील शेतकरी व कष्टकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाढत्या शेती खर्चाच्या पार्श्वभूमीवर मोफत खत वाटपाचा हा उपक्रम शेतकर्‍यांसाठी मोठा दिलासादायक ठरला.  कार्यक्रमाला शिवशक्ती-भीमशक्ती विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते माऊली शिंदे (अंथरवनपिंपरी) यांच्यासह चौसाळा, लिंबागणेश सर्कल आणि बालाघाट परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी मा. जावेद भैया कुरेशी यांनी स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून शेतकरी कल्याणासाठी अशा समाजोपयोगी उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे सांगितले. सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरील समाधान आणि त्यांचे आशीर्वाद हीच समाजसेवेची खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले. बाळासाहेब मोरे पाटील यांनी आपल्या मनोगतात, शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. मोफत खत वाटपामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना उपस्थित शेतकर्‍यांनी व्यक्त केली. तसेच या उपक्रमाबद्दल मा. जावेद भैया कुरेशी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

COMMENTS